Wed. Aug 4th, 2021

‘या’ कारणास्तव खासदार संजय राऊत यांनी घेतली शरद पवार यांची भेट

आता शिवसेने नेते व खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांच्या मुंबईमधील निवासस्थानी त्याची भेट घेण्यास पोहचले आहेत.  त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली असेल यावरुन चर्चेचे उधाण आले आहे.  

राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर राज्यभरात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्यानंतर ईडी प्रकरणाची चर्चा सुरु असतानाच, अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा देवून खळबळ उडवली आहे.

आता शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांच्या मुंबईमधील निवासस्थानी त्याची भेट घेण्यास पोहचले आहेत.  त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली असेल यावरुन अनेक तर्क लावले जात आहेत.

संजय राऊत यांनी का घेतली भेट

शरद पवार यांची भेट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी का भेट घेतली आणि त्यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली असेल. याबाबतीत अजून कोणतीही माहिती समजू शकलेली नाही.

मात्र अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांनी का शरद पवार यांची का भेट घेतली यावरुन विविध चर्चांना उधाण आले आहे.

संजय राऊत यांनी असे सांगितले की, शरद पवार आणि माझी भेट राजकीय भेट नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार आणि माझे व्यक्तिगत संबध आहेत. आणि गेल्या काही दिवसापासून ज्या घडामोडी घडत आहेत. त्या संबधित त्यांची चौकशी करण्यासाठी त्यांची भेट घेतली असल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *