Mon. Feb 24th, 2020

जिनके घर…संजय राऊतांचं आणखी एक ट्विट

मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या महिन्याभरापासून राजकीय नाट्य चांगेलच तापलेले आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत महिन्याभरापासून दररोज शायरीतून भाजपला चिमटा काढत आहे. हाच नित्यक्रम त्यांनी अखंडपणे सुरु ठेवला आहे. संजय राऊतांनी आजही एक शायरी ट्विट केली आहे.

“शेठ, जिनके घर शीशे के होते हैं, वह दुसरो के घर पत्थर नहीं फेंका करते” भाजपला उद्देशून असे ट्विट संजय राऊतांनी केले आहे.

संजय राऊतांच्या ट्विटला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नेहमीप्रमाणे आजही शायरीनेच समर्थन दिले आहे. नवाब मलिक यांनी देखील संजय राऊतांचे ट्विट शेअर करत शायरी ट्विट केली आहे.

‘बस एक ही ठोकर से गिर जाएँगी दीवारें… आहिस्ता ज़रा चलिए शीशे के मकानों में’, अशी शायरी नवाब मलिक यांनी ट्विट केली आहे. नवाब मलिक यांनी देखील ट्विटद्वारे भाजपला चिमटा काढला.

संजय राऊतांची महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेत महत्तावाची भूमिका राहिली आहे. भाजप विरोधात त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरुन घेतलेली आक्रमक भूमिका सर्वांनीच पाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *