लहरी हवामान खातं बंद करा; शिवसैनिकांची मागणी
जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
हवामान खात्याने सांगितले पाऊस पडणार तर पाऊस पडणारच नाही. पण, हवामान खातं बोललं की पाऊस नाही पडणार तर पाऊस हमखास पडतो.
अगदी सर्वसामान्यांपर्यंत थट्टेचा विषय बनलेलं हवामान खातं. सर्वसामान्यांना हवामान खात्याचे अंदाज चुकल्याचा परिणाम जास्त पडत नसला तरी शेतकऱ्यांना त्याचा
मोठा फटका बसतो.
पिकांचे शेतीचे अंदाज याच हवामान खात्याच्या अंदाजावर अवलंबून असतात. पण वारंवार हे अंदाज चुकत असल्यानं आता हवामान खात्याचीच तक्रार करण्यात आली आहे.
हवामान खातंच बंद करा अशी मागणी सोलापूरच्या शिवसैनिकांनी केली. शिवसेनेतर्फे लिंबू मिरची देऊनही अनोखं आंदोलन करण्यात आले.