Jaimaharashtra news

शासकीय कापूस खरेदी केंद्रांवरील भीषण वास्तव…

बीड जिल्ह्यातील शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार  समोर येत आहे. कापूस फेडरेशनशी संलग्न शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदी करताना एक क्विंटल कापसा मध्ये 7 किलो चा भुर्दंड शेतकऱ्यांच्या माथी मारत असल्याचे वास्तव समोर आलं आहे. ही गोष्टी शेतकऱ्याला माहीत होताच या विरोधात शेतकऱ्यानी आवज उठवत खरेदी केंद्र बंद पाडले आहे. विशेष म्हणजे पणनच्या प्रतवारी अधिकाऱ्याच्या संगण मताने हा प्रकार होतं असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

बीड तालुक्यातील मैदा पोखरी येथील नर्मदादेवी कॉटनस्पिन या जिनिंग मध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या पावत्यावर तसा उल्लेख केला आहे. याबाबतीत शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसंच लूट थांबल्याशिवाय केंद्र चालू केलें जाणारे नाही असा इशारा दिला आहे.

कापूस फेडरेशनच्या प्रतवारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमताने हा प्रकार राजरोस सुरु आहेत.

बीड जिल्ह्यात 26 शासकीय कापूस खरेदी केंद्रांवर खरेदी सुरू आहे.

पणनच्या कापूस खरेदी केंद्र चालकाच्या हलगर्जीपणामुळे बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.

याचं कारणही तसंच आहे. ओल्या दुष्काळामध्ये होरपळणाऱ्या या शेतकऱ्याने उरलासुरला कापूस वेचून विक्रीसाठी केंद्राच्या शासकीय खरेदी संस्थेवर घेऊन आले. मात्र त्या रक्त आठवून पिकवलेल्या कापसावर डल्ला मारला जात आहे.

एक तर व्यापाऱ्याचा कापूस आगोदर खरेदी केला जातो तर शेतकऱ्यांना आठ आठ दिवसापासून कापूस खरेदी केला जावा म्हणून वाहनासह रांग लावून उभे आहेत. मात्र कापूसच खरेदी केला जात नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. यामुळे वाहन खर्चाचा अतीरक्त बोजा सहन करवा लागत आहे. अधिकारी या बाबतीत लक्ष देत नाही असा आरोप शेतकरी करत आहेत.

बीड तालुक्यातील नर्मदादेवी कॉटनस्पिन मैदापोखरी येथील जिनिंगवर आज 200 गाड्या आणि शेतकरी खोळंबून थांबले आहेत.

खरेदी केंद्र चालक प्रत्येक शेतकऱ्यांच्या एकूण झालेल्या वजनापैकी प्रत्येक क्विंटलला 7 किलो कपात केली जाते.

तसंच खासगी प्रतवारी अधिकाऱ्यांला नेमून बेभाव कापूसाची खरेदी केली जात आहे.

कालपर्यंत या खरेदी केंद्रावर तब्बल 1,061 शेतकऱ्यांच्या 32,315 क्विंटल कापूस खरेदी केली.

यात कापसाची प्रतवारी कमी आहे असं म्हणत बेकायदेशीररीत्या क्विंटलला 7kg म्हणजे तब्बल 2262 क्विंटल कापूसाची लूट केली.

त्यात कोट्यवधी रुपये जिनिंग मालक आणि पणनचे अधिकारी लूटत असल्याचं वास्तव आहे.

यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे

महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंग परळी विभागात 25 केंद्रावर कापूस खरेदी सुरु आहे. या विभागात कालपर्यंत 4 लाख 37हजार 500 क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.

पंचवीस केंद्रावर आठ प्रतवारी अधिकारी आहेत त्यामुळे अडचण होते.

1)नर्मदादेवी कोटेक्स -1061 शेतकरी  32315 क्विंटल

2)महाराष्ट्र कोटेक्स -शेतकरी-644- 20073क्विंटल

3)साई कोटेक्स वडवणी -शेतकरी 551-16119 क्विंटल

4)घाट सावळी – शेतकरी-165 -5045 क्विंटल

कापसाची आवक जास्त आहे. काम करतांना मार्केट कमिटीला मार्केट यार्ड नाही. खरेदी केंद्रावर भेट दिली पण अशी शेतकऱ्यांनी तक्रार केली नाही असं म्हणतं पणनचे परळी विभागाचे विभागीय व्यवस्थापक प्रवीण भूकावल यांनी दुर्लक्ष करत अधिकाऱ्यांना पाठीशी घातले.

नर्मदादेवी कॉटनस्पिन शासकीय कापूस खरेदी केंद्रावरील वरिष्ट प्रतवारी अधिकारी यांना विचारला केली असतांना 12 पेक्षा जास्त आर्द्रता असलेला कापूस खरेदी करुन नका असे CCI चे नियम आहेत. तसेच कापसात कवडी (खराब कापूस) असते म्हणून आम्ही शेतकऱ्यांचा कापूस कपात करतो आणि त्यांना भाव जास्त देतो असं फोनवर सांगितलं. प्रत्यक्ष बोलण्यास नकार दिला. यामुळे जिनिंगवाल्यांना पाठीशी घालत लूट करण्याऱ्या सुदाम घुगे या प्रतवारी अधिकाऱ्याला निलंबित करा अशी मागणी होतेय.

1) खरेदी केंद्रावर बोगस प्रतवारी अधिकारी

2) प्रतवारी करतांना भेद भाव (भावावर परीनाम)

3) बेकायदशीर रीत्या कवडी(खराब कापूस )नावाने 70/80किलो कपात प्रती क्विंटल

4) 7/12 चा गोंधळ व्यापाऱ्यांकडून खरेदी

5) खोटी चार्ज (गाडीचा वाहतूक खर्च उभा असेल तर होल्डीग चार्ज पर डे 1 हजार रुपये )

6) बाजार समिती शुल्क टोकन प्रती वाहन-500

Exit mobile version