Sun. Apr 18th, 2021

पाकिस्तानमध्ये शीख मुलीचे जबरदस्तीने धर्मांतर करत लावले लग्न!

गुरुद्वाऱ्यात पुजारी म्हणुन सेवा करणाऱ्या मुलीचं अपहरण करुन तिचे जबरदस्तीने धर्मांतर करुन. मुस्लिम तरुणाशी लग्न करुन देण्यात आले.  

पाकिस्तानातील एका शीख मुलीचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले. पाकिस्तानात शीख समाजाचे पहिले गुरु नानक देव यांच्या 550 व्या जंयतीला काही दिवस शिल्लक असतान  या समाजास हादरवून टाकणारी एक घटना पाकिस्तानमध्ये घडली आहे. गुरुद्वाऱ्यात पुजारी म्हणून सेवा करणाऱ्या मुलीचं अपहरण करुन तिचे जबरदस्तीने धर्मांतर केलं गेलं मुस्लिम तरुणाशी लग्न करुन देण्यात आले.

नेमकं प्रकरण काय?

ज्या ठिकाणी गुरु नानक यांचा जन्म झाला होता. त्याच ठिकाणी ही घटना घडली. ननकाना साहिब या पोलिस ठाण्यात FIR  दाखल करण्यात आली आहे.

या गुरुद्वाऱ्यामध्ये सेवा करणाऱ्या भगवान सिंग यांच्या मुलीचे 28 ऑगस्ट या रोजी अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिचे जबरदस्तीने धर्मांतर करुन मोहम्मद एहसान या मुस्लिम मुलाशी तिचे लग्न लावून देण्यात आले.

या मुलीच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, मुलगी स्वतःच्या मर्जीने हे लग्न करत आहे. त्यात तिने तिचे वय 19 असे सांगितले आहे.

पंरतु मनमोहन सिंग या तिच्या भावाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करताना 16 ते 17 असे तिचे वय सांगितले आहे.

मुलीच्या भावाने केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी एहसानसह सहा जणांना अटक केली आहे. यात एका महिलेचा ही समावेश आहे.

मुलीच्या लहान भावाने दिलेल्या माहितीत त्याने असे सांगितले की, त्याच्या बहिणीचा साखरपुडा झाला आहे.

ती तिच्या मोठ्या बहिणीकडे गेली होती. त्यावेळी सशस्त्र टोळीने त्याच्यावर हल्ला केला आणि मुलीचे अपहरण केले. या अगोदर ही अशा अपहरणाच्या अनेक घटना घडल्या आहेत.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *