Wed. Jan 19th, 2022

‘१३ रुपयामधून सरकारचे १३ वा घालावे का?’ – राजू शेट्टी

ऐन थंडीच्या दिवसात अवकाळी पावसाने राज्यात हजेरी लावली. मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोलापूरमध्ये अवकाळी पावसाने मागील दोन दिवसांत जोरदार हजेरी लावल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा जबर फटका बसला आहे.

सोलापूरमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला २४ पोती कांदा विकून शेतकऱ्यांच्या पदरी केवळ १३ रुपये हातात आले. त्यामुळे शेतकऱ्याने सोशल मिडीयावर आपल्या कांदा विक्रीची पावती सोशल मिडीयावर व्हायरल केली आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ट्विट करत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घटनेची माहिती दिली आहे.

शेतकऱ्यांना मिळालेल्या १३ रुपयांमधून सरकारचे १३ वा घालावे का? असा सवाल राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला विचारला आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितील काल बापू कावडे या शेतकऱ्यांने २४ पोते कांदे रूद्रेश पाटील या व्यापाऱ्याला विक्री केले.’

सोलापूरमध्ये अकवाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा खराब झाला आहे. कांदा खराब झाल्यामुळे पुढील काही दिवसात बाजारात कांद्याची आवक भासणार आहे. शेतकऱ्यांचा खराब कांदा बाजारात विकला जात नाही.  राज्यात अवकाळी पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *