श्रद्धाचा मालदीव मधला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल…

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या हटके अंदाजासाठी आणि लूकसाठी नेहमीच चर्चेत असते. आता सध्याला श्रद्धाचा मालदीव मधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये श्रद्धाच हटके लूक दिसत आहे. श्रद्धा ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. श्रद्धा ही मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी नाही तर तिच्या भावाच्या लग्नासाठी गेली आहे. तिथला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये श्रद्धाचं हटके अंदाज दिसून येत असून या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांच्या कमेंट केल्या आहे. शिवाय श्रद्धाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत श्रद्धाने सीग्रीन रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. व्हिडिओत श्रद्धा ही समुद्र किनाऱ्यावर नाचताना दिसते.
हा व्हिडीओ शेअर करत श्रद्धाने #ShazaSharmaGayi हे हॅशटॅग वापरलं आहे. या लग्नाचे अनेत व्हिडिओ व्हायरल झाले आहे. यापुर्वी मालदीवला लग्नासाठी निघालेल्या, श्रद्धा आणि तिच्या भावाला सिद्धांतला मुंबई विमाणतळावर पाहिले होते. त्यावेळी दोघांनीही “तिकडे जिथे शजाचं लग्न प्रियांकशी होतं” असे लिहिलेलं टी-शर्ट परिधान केले होते. प्रियांक हा प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा असून त्याची होणारी पत्नी शजा ही करीम मोरानी यांची लेक आहे. शिवाय प्रियांक शजा सोबतचे अनेक फोटो हा सोशल मीडियावर शेअर करत असतो. गेल्या अनेक वर्षेपासून ते दोघे एकमेकांना डेट करत होते. आता हे दोघे लग्न बंधनात अडकणार आहेत. तसेच प्रियांकने ‘सब कुशन मंगल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते मात्र पाहिजे तसं तो नाव कमावू शकला नाही. या चित्रपटातून भोजपुरी अभिनेता रवी किशन यांची मुलगी रीवानेदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होतं.