Thu. Jul 16th, 2020

सिद्धार्थ शुक्ला ठरला बिग बॉस 13 चा विजेता

बहुचर्चित बिग बॉस शोचा 13 वा सिजन संपला आहे. सिद्धार्थ शुक्ला या सिझनचा विजेता ठरला आहे. सिद्धार्थला ट्रॉफी आणि 40 लाख रुपये मिळाले आहेत.  

बिग बॉस 13 च्या ग्रँड फिनालेला पहिले पारस छाब्रा घरातून बाहेर पडला. त्याने 10 लाख रुपयांची बॅग स्वीकारून घरातून एक्झिट घेतली. त्याच्यानंतर शेहनाज गिल, रश्मी देसाई आणि आरती सिंग हे देखील घरातून एक एक करत बाहेर पडले. त्यामुळे थेट लढत असीम आणि सिद्धार्थ यांच्यात होती.अंतिम निकालासाठी 15 मिनिटं फोन लाईन्स ओपन ठेवल्या गेल्या. यामध्ये सिद्धार्थला जास्त मतं पडल्याने तो विजेता ठरला.

बिग बॉस 13 चा सिझन हा सर्वाधिक काळ चालल्याचं सांगितलं जातंय. ग्रँड फिनलेला स्पर्धकांचे कुटुंबीय हजर होते. तसंच बाद झालेले स्पर्धकही होते. सलमान खानसोबत हरभजन सिंग आणि मोहम्मद कैफने क्रिकेट खेळून रंगत आणली. तसंच सुनिल ग्रोवरने मिमिक्री करून धमाल केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *