अहंकारी केंद्र सरकारचा नाश होईल- नवजोत सिंग सिद्धू

“केंद्रातील भाजप सरकार अहंकारी आहे. जिथे अहंकार असतो तिथे नाश ठरलेलाच असतो. त्यामुळे या सरकारचा नाश होईल” अशा शब्दांत काँग्रेस नेते आणि पंजाबमधील मंत्री नवजोत सिंग सिद्धू यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
लोकतंत्र नव्हे, गुंडातंत्र!
या सरकारने लोकतंत्र हे दंडातंत्रमध्ये परिवर्तित केलंय. हे गुंडा तंत्र निर्माण केले जाते भयाने ग्रस्त करून टाकण्यासारखी ही परिस्थिती असून, हे लोकतंत्र नाही असे शब्द यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
भारतामध्ये संस्थांना ग्रहण लागले आहे हे राहू केतू हे ग्रह लवकरच संपणार आहे. कोलकत्त्यामध्ये जे घडतंय, ते जनता पाहतेय. लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा अशा प्रकारची वागणूक केंद्र सरकारकडून दिली जातेय, हे जनता बघतेच आहे, असं म्हणत आपण ममतादीदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचं म्हणाले आहे.
“मात्र सध्याच्या परिस्थितीत सीबीआय कठपुतळी आहे. विरोधकांना चिरडण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र सत्य त्यापुढे दबणार नाही”, असंही सिद्धू म्हणाले…
“अब एक और एक ग्यारह, BJP नौ, दो, ग्यारह”!
प्रियंका गांधी काँग्रेससाठी बहार म्हणून आले आहेत. पहिल्यांदा ‘अकेला भाई हमारी सेना थी अब एक और एक ग्यारह बीजेपी नौ दो ग्यारह होईल’ असं सिद्धू म्हणाले.
प्रियांका गांधींसाठी काही राजकारण फुलांची शैय्या नसून काट्यांचा मार्ग आहे.
अत्यंत कठीण जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे आणि जबाबदारी पूर्ण करण्याची त्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे.
त्यांची छबी इंदिरा गांधींची आठवण करून देते.
त्या एक टेरिफिक रोल मॉडेल आहेत.
त्या आल्याने काँग्रेसमध्ये सकारात्मक वातावरण आहे.
सकारात्मक ऊर्जा कार्यकर्त्यांना मिळाले असून प्रियंका गांधी यांच्यामुळे काँग्रेसला खूप मोठा फायदा होईल असेही सिद्धू म्हणाले.
अण्णा हजारे याना काही कोणाकडून घ्यायचं नाही तर समाजाला द्यायचं आहे.
त्याची एक विचारसरणी आहे.
त्यांनी काहीजणांना मुख्यमंत्री बनवले त्याच स्वतः एक वेगळं स्थान आहे जे सन्मानजनक आहे.
ते जेव्हा बोलतात तेव्हा लोक अण्णा निष्काम सेवक आहेत म्हणून त्यांचं ऐकतात.
याबदल्यात त्यांना सत्ता, ताकद, पद नको आहे.
‘देनेवाले को जोडनेवाले को सन्मान मिलता है,और तोडनेवालो को अपमान मिलता है’ अशा शब्दांत त्यांनी आण्णाचा गौरव केलाय.