चिपी विमानतळाला केंद्र सरकार कडून विमानसेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली नाही

बहुचर्चित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ याला केंद्र सरकार कडून विमानसेवा सुरू करण्याची परवानगी मिळालेली नाही. केंद्राच्या डी जी सी ए विभागाचे पथक यानी चिपी विमानतळास भेट देत पहाणी केली होती. त्यानंतर 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे जयंतीचा मुहूर्त साधणारी व्हायरल झालेली निमंत्रण पत्रिका चर्चेत ठरली. त्यांवर उच्च तत्रा शिक्षण मंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांनी केंद्राकडून अद्याप परवानग्या मिळायच्या असल्याने उदघाटन म्हणजे प्रत्यक्ष उडान सेवा सुरू करायला परवानगी नंतर आठ दिवस कालावधी जाईल असे सांगितले.
मात्र मुख्यमंत्री सिंधुदुर्ग चिपी दोरा याच्या पाश्र्वभूमीवर चिपी विमानतळ परिसरात अंतर्गत रस्ते, धावपट्टीवरिल रंगरंगोटी , अधिकची राज्य पोलीस कृती दल , सिंधुदुर्ग पोलीस दल ,चिपी विमानतळ परिसरात दाखल झाले आहेत वं प्रत्यक्ष विमानसेवा सुरू झाल्यावर घ्यायची काळजी याबाबत ट्रेनिग सुरू झाले आहे. मात्र याबाबत पोलीस विभाग व आय आर बी चे अधिकारी अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दर्शवत आहेत.