Tue. Jul 14th, 2020

सिंहगड किल्ला एक महिना पर्यटकांसाठी बंद

पुणे : पुण्याजवळील असलेला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी एक महिना बंद करण्यात आला आहे. सिंहगड घाट रस्त्यावर दरड पडण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे त्या भागात संरक्षण जाळ्या बसवण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आलाय.

त्यामुळे २ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान सिंहगड घाट रस्ता पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. गडावर जाण्यास इच्छुकांनी पायवाटेचा वापर करावा असे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आलंय.

सिंहगड घाट रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळतात.पर्यटक गडावर अडकून पडतात. यामुळे आता एक महिना काम होण्यापर्यंत रस्ता बंद राहणार आहे.

त्यामुळे गडप्रेमींना तसेच पर्यटकांना सिंहगडावर जाण्यासाठी महिनाभर वाट पाहावी लागणार आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *