Mon. Mar 8th, 2021

दिल्लीतील कोरोना आता कंट्रोलमध्ये- अरविंद केजरीवाल

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तरीही दिल्लीतील निजामुद्दिन परिसरात झालेल्या तबलिगी जमात मरकज या धार्मिक कार्यक्रमात कोरोनाग्रस्तांच्या उपस्थितीमुळे आणखी कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यातच या कार्यक्रमात सहभागी झालेले क्वारंटाईनमध्ये डॉक्टरांशी गैरव्यवहार करत असल्याच्या बातम्याही येत आहेत. अशा परिस्थितीत दिल्लीमध्ये कोरोनाचं संकट वाढेल अशी भीती असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवंद केजरीवाल यांनी मात्र दिल्लीतील कोरोना कंट्रोलमध्ये आल्याचं स्पष्ट केलं आहे.

आत्तापर्यंत नवी दिल्लीमध्ये ४४५ कोरोनाग्रस्त आढळून आले होते. यातील संसर्गातून कोरोना झालेले रुग्ण फक्त ४० जणच आहेत. त्याव्यतिरिक्त इतर कोरोनाबाधित रुग्ण हे परदेशातून आले होते किंवा मरकजच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे कोरोनाचा त्यापेक्षा जास्त संसर्ग नाही ही समाधानाची बाब असल्याचं केजरवाल यांनी म्हटलंय. तसंच गेल्या १ ते दीड महिन्यांत ज्या फ्लाईट्स दिल्लीला आल्या, त्यातील प्रवाशांना विविध ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आलं असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. परदेशातून येणारे आणि मरकजमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीशिवाय कुणीही कोरोनाबाधित नाही, असं म्हणण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *