Sat. Apr 17th, 2021

पोलीसांनी उघडला दरवाजा आणि सापडलं…….

पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 2002  मध्ये एका युवकाचा खून झाला पण त्याच्या शरीराचा सांगाडा त्याच्या कुटुंबियांना देण्यातच आला नाही. 17 वर्षांनी कोथरूड पोलीस स्टेशनच्या मुद्देमाल खोलीत त्याच्या शरीराचा सांगाडा पुन्हा सापडला. आणि पोलिसांनी त्या सांगाड्याचा इतिहास शोधला आणि अखेर निखील रणपिसेच्या सांगाड्यावर तब्बल 17 वर्षांनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वी कोथरूड पोलीस स्टेशनातील पहिल्या मजल्यावरची मुद्देमाल खोली साफ करण्यात येत होती…
तेव्हा त्या खोलीत एक खोकं सापडलं,त्या खोक्यावर मानवी सांगाडा असल्याच लिहिलं होतं.
हे पाहून खोलीतील सामान हलवायला आलेले पोलीस कर्मचारी चक्रावलेच.
त्यांनी लगेच वरिष्ठांना या खोक्याची माहिती दिली. त्या खोक्यावर खटला क्रमांकही लिहिला होता.
खटला क्रमांकाच्या आधारे हा सांगाडा कोणाचा आहे याचा शोध लावण्यात आला.

2002 मध्ये झाला होता खून

2002 मध्ये एमआयटी कॉलेज मागील टेकडीवर काही दिवसांपासून कुजणारं एक प्रेत मिळालं होतं.
2 वर्ष शोध घेतल्यानंतर हे प्रेत निखील रणपिसे  नावाच्या 16 वर्षांच्या तरुणाचं असल्याचं स्पष्ट झालं.
लगेच त्याच्या वडिलांना याबाबत माहिती देण्यात आली होती. निखीलचा त्याच्याच दोन मित्रांनी खून केला होता.
तब्बल 13 वर्षांनी हा सापळा हाती लागल्यानंतर पोलिसांनी लगेच निखील रणपिसेच्या वडिलांचा शोध घेतला…
तेव्हा तब्येतीची कारणं देत आपण निखीलवर अंत्यसंस्कार करण्यास असमर्थ आहोत असं त्यांनी सांगितलं.
पण अंत्यसंस्कार करण्यासाठी घटनास्थळी उपस्थित राहू अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी निखीलवर हिंदू धर्मानुसार कोथरुड येथील स्मशानभूमीतअंत्यविधी केले गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *