Tue. Nov 24th, 2020

हिटलरपासून नेमकी प्रेरणा कुणी घेतली?- स्मृती इराणींचा राहुल गांधींना टोला

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

राहूल गांधींनी बंगळूच्या कार्यक्रमात सरकारला हिटलरची उपमा दिली. यावेळी ‘देशात आज सत्याचा गळा घोटला जात आहे. हिटलरच्या राजवटीतही हेच व्हायचे.

 

‘वास्तवावर मजबूत पकड ठेवा म्हणजे कधीही त्याची मुस्कटदाबी करता येईल’, असं हिटलरचं वाक्य त्यांनी यावेळी विरोधकांसाठी शस्र म्हणून वापरलं.

 

तर त्यांच्या या वक्तव्यावर स्मृती इराणी यांनी ट्विटरच्या माध्यमातून चोख प्रत्यूत्तर दिलं. तर ‘हुकूमशाहीचं वास्तव समजायला तुम्हाला 42 वर्षे उशीर झाला आहे,’ असा खोचक टोलाही यावेळी स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना हाणला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *