Thu. Apr 22nd, 2021

माणसाला चावला विषारी साप, पण माणूस सुखरूप, सापच मेला!

साप चावल्याने माणूस मेल्याचं अनेकवेळा आपण ऐकलं असेल, पण एखाद्या माणसाला साप चावल्यावर चक्क सापाचाच मृत्यू झाल्याचं कधी ऐकलंय का? बिहारच्या प्रतापगड भागात असं प्रत्यक्षात घडलंय. 55 वर्षीय व्यक्तीला विषारी साप चावल्यावरही त्या माणसाला काही झालं नाही, उलट सापच मेला…

काय घडलं नेमकं?

बिहारमधील प्रतापगड येथील सुखानगर गावात हा विचित्र प्रकार घडलाय.

या गावात राहणारे सुबोध प्रसाद सिंह हे शेतात काम करत होते.

त्यावेळी त्यांना सापाची सळसळ जाणवली.

मात्र त्यांच्या सावरायला वेळ मिळायच्या आतच त्या विषारी सापाने त्यांना दंश केला.

मात्र सुबोध यांनी घाबरून न जाता दंश झालेल्या भागाच्या बाजूला कापड घट्ट बांधून ठेवलं.

त्यानंतर ते रूग्णालयात दाखल झाले आणि वेळेवर उपचार मिळाल्याने बचावले.

मात्र या प्रकारानंतर सुबोध यांचे कुटुंबिय जेव्हा शेतात गेले, तेव्हा त्यांना चक्क तो साप मेलेला आढळला.

कशामुळे घडला हा प्रकार?

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कात टाकण्याच्या काळात सापाला खूपच वेदना होत असतात. अशावेळी सापाने एखाद्याला दंश केला, तरी सापामध्ये विष सोडायची ताकद नसते. त्यामुळे माणूस वाचू शकतो. मात्र विष सापाच्याच तोंडात राहिल्यामुळे सापाला त्याचा त्रास होऊन साप मरू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *