Sun. Oct 17th, 2021

सापाने केले ट्रॅफिक जॅम

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

 

कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी वाढत्या रहदारीमुळे आपल्या दैनंदिन जीवनात वाहतूकीची समस्या नेहमीत उद्भवते.

 

जळगावमध्ये ऐन रहदारीच्यावेळी चक्क एका सापानेच दोन तास वाहतूकीचा खोळंबा केला.

 

सहा फूट धामण जातीचा साप भरचौकातील मोठ्या झाडावर चढला होता. तर, सापाला बघण्यासाठी परिसरात गर्दी उसळली होती.

 

त्यामुळे गर्दी हटवण्यासाठी वाहतूक पोलिसांची मोठी दमछाक झाली.

 

यावेळी सर्प मित्रांच्या अथक प्रयत्नानंतर सापाला झाडावरुन खाली काढून ताब्यात घेतले. यावेळी भक्षाच्या शोधात बिनविषारी साप झाडावर चढत असल्याची माहिती सर्प

मित्र वासुदेव वाढे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *