Sat. Nov 28th, 2020

‘त्या’ हत्येचा उलगडा, आईला त्रास देणाऱ्या वडिलांचा मुलांनीच काढला काटा

दारू पिऊन आपल्या आईला सतत मारहाण करणाऱ्या वडिलांच्या त्रासाला कंटाळून पोटच्या मुलांनीच कुऱ्हाड आणि विळ्याने गळा कापून वडिलांचा खून केल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी पत्नी आणि दोन मुलांना मंद्रूप पोलिसांनी अटक केली. बुधवारी त्यांना सोलापूरच्या न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली.

सोलापुर जिल्ह्यातील भंडारकवठे येथील भीमा नदीच्या पात्रात एका व्यक्तीचा अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने गळा चिरून खून करून मृतदेह पाण्यात टाकला होता. या व्यक्तीचं नाव दत्तात्रय सिध्दाराम चौगुले असून तो मूळचा वळसंगचा असून सध्या निबर्गी येथील शेतात सालगडी म्हणून काम करीत होता. आपल्या कुटुंबासह येथेच राहत होता .

घटना घडल्यापासून दत्तात्रयची पत्नी सुनिता, मुलगा आतिष आणि अल्पवयीन मुलगा फरार होते.

त्यांचे मोबाईलही बंद होते.

त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीनच बळावला.

खबऱ्यांमार्फत संशयित मारेकरी निबर्गी येथे येत असल्याची माहिती मिळताच मंद्रूप पोलिसांनी चडचण पोलिसांच्या मदतीने पत्नी सुनिता चौगुले, मुलगा आतिष चौगुले व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्यांना अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *