Jaimaharashtra news

स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर मेळघाटातील ‘चोपण’ गावाला सौरउर्जेतून वीजपुरवठा

मुंबईत काही दिवसांपूर्वी काही वेळ विज वितरण खंडित झाला होता. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता.. तर माध्यमात बातम्या देखील प्रसारित झाल्यात.. याबाबत ऊर्जा मंत्र्यांना याचं उत्तर द्यावं लागलं होतं.. मात्र देशाला स्वतंत्र मिळून ७० वर्ष झालेत.. तरी सुद्धा अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील अतिदुर्गम चोपण गावात वीज नव्हती.. मात्र जिल्हा प्रशासनाने मेळघाटातील गावांमध्ये वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौर ऊर्जाधारित वीज प्रकल्पाला जिल्हा प्रशासनाकडून चालना देण्यात येत आहे… या दुर्गम गावात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे ‘मेडा’च्या सहकार्याने सौर ऊर्जाधारित पारेषण प्रकल्प आकारास आला.. याप्रकारे संपूर्ण गावाला वीज उपलब्ध करुन देणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प आहे..

अमरावती शहरापासून तब्बल १९५ किलोमीटर अंतरावर दुर्गम भागात वसलेलंचोपण हे गाव.. पाहिलं तर या गावात येण्यासाठी पक्का रस्ता नाही.. दुचाकी चालण्यास सुद्धा येथे मोठ्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो..येथे ये जा करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सोइ सुविधा नाहीये.. बस येत होती पण ते सुद्धा आता बंद झाली.. चौराकुंड ग्रामपंचायती अंतर्गत चोपण हे दुर्गम गाव आहे. तेथील १६१ घरांना या प्रकल्पामुळे वीज जोडणी मिळणार आहे.

पूर्वी या गावात वीज नव्हती.. त्यामुळे या गावात रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून येथील नागरिकांना रहांव लागत होत.. वीज पुरवठा नसल्याने जगात काय घडामोडी सुरू आहे हे सुद्धा येथील नागरिकांना माहिती नव्हते.. मात्र आता गावात सर्वांच्या घरी विज पुरवठा सुरू झाला आहे..त्यामुळे आता ७० वर्षांनंतर गावात विज पोहचल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलंल आहे..

या चोपण गावात पूर्णपणे आदिवासी बांधव राहतात.. आता बघितलं तर सर्वांच्या घरात लाईट,पंखे,टीव्ही सुरू झाली आहे.. त्यामुळे आता येथील नागरिकांनी दिलासा व्यक्त केलाय..

वीज नसलेल्या गावांसाठी हा सोलर मायक्रो ग्रीड प्रकल्प राबवला जातो. त्याद्वारे गावाला २४ तास वीजपुरवठा शक्य होतो. चोपण येथील प्रकल्प २४ किलोवॅट क्षमतेचा आहे. त्याची प्रकल्प किंमत ४२.४४ लाख आहे..धारणीच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे ‘मेडा’ला सहकार्य लाभले आहे. सौर उर्जेवरती संपूर्ण गावामध्ये पथदिवे व घरांमध्ये वीजजोडणी करण्यात आली असून हा महाराष्ट्रातील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे. सातपुडा पर्वत रांगेत दऱ्या खोऱ्यात वसलेल्या वसलेला दुर्गम भाग त्यामुळे सोईसुविधा नाही. दळन वळन नाही. मेळघाटात चोपणच नाही तर अनेक गावांत आजही वीज पोहचू शकली नाही आहे.परन्तु शासनाच्या महाऊर्जा प्रकल्पा अंतर्गत आता हे गाव अंधारमुक्त झालं आहे..

Exit mobile version