Mon. Nov 30th, 2020

ख्रिसमस सणाबद्दलच्या या गोष्टी माहीत आहेत का?

25 डिसेंबर रोजी येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून ख्रिसमस साजरा केला जातो. याच दिवशी बोथेलेहम गावातील एका गोठ्यात येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्याचं मानलं जातं. मात्र तुम्हाला माहीत आहे का, पूर्वी 25 डिसेंबर हा ख्रिस्ताचा जन्मदिवस मानला जात नव्हता. तेव्हा ख्रिसमस जगभरात वेगवेगळ्या दिवशी साजरा होत असे.

प्रारंभीच्या काळात Christmas सण ख्रिस्तसभेत अस्तित्वात नव्हता.

येशूजन्माचा उत्सव हा पूर्वी 6 जानेवारी रोजी साजरा केला जात असे.

ख्रिस्तसभेमध्ये हा सण जवळपास तिसऱ्या शतकातच्या साजरा करण्यात येऊ लागला.

‘सूर्यजन्म’ कसा झाला ‘ख्रिस्तजन्म’?

प्रारंभीच्या काळात रोम शहरामध्ये अनेक लोक सूर्याची उपासना करत असत.

रोमन सम्राट कॉन्स्टन्टाईन देखील सूर्येपासक होता.

22 डिसेंबरनंतर सूर्याचं दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होतं.

या दिवसापासून दिवस मोठे होऊ लागतात.

रोमन लोकांच्या धार्मिक श्रद्धेनुसार हा सुर्याचा नवीन जन्मच असल्याचं मानलं जातं.

या दिवासाला सूर्यदेवाचा नवजन्म म्हणून रोमन लोक साजरा करत.

ख्रिस्ती मान्यतेनुसार कॉन्स्टन्टाई सम्राटाने याच दरम्यान ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला.

त्यामुळे रोम शहरात 25 डिसेंबर ही येशूचा जन्मदिवसाची तारीख ठरवण्यात आली.

ख्रिसमसला नाताळ का म्हटलं जातं?

रोमध्ये 25 डिसेंबर हा दिवस कॅथोलिक ख्रिस्तसभेत येशू ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. सूर्यदेवाच्या वाढदिवसाला रोमन भाषेत ‘नातालीज सोलिस इनइक्विटी’ म्हणजे ‘अजिंक्य सूर्यदेवाचा वाढदिवस’ असं म्हणत.

त्यामुळे या उत्सवाला ‘नाताळ’ असं नाव पडलं.

भारतातही ख्रिसमस मोठ्या उत्साहाने साजरा होतो.

गोव्यामधील ‘बॉम जिसस’ हे अशियातलं सर्वांत मोठं चर्च असून अनेक धार्मिक श्रद्धाळू लोक या ठिकाणी येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी येतात.

गोव्याप्रमाणेच केरळ, पुद्दुचेरी, नागालॅंड, मुंबई, आसाम, बंगाल अशा अनेक ठिकाणी ख्रिस्ती लोकांची संख्या लक्षणीय असल्यामुळे येथे Xmas सण मोठ्या उत्साहात साजरा होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *