Tue. Nov 30th, 2021

नाशिकच्या सोमेश्वर धबधबा वाहतोय खळखळून

नाशिक : नाशिकच्या सोमेश्वर भागात असलेला धबधबा आता खळखळून वाहत आहे. पर्यटन स्थळावर सध्या पर्यटकांना बंदी असल्याने याठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. इतर वेळेस या धबधब्याचे सौंदर्य बघण्यासाठी आणि कॅमेरात टिपण्यासाठी अनेक नाशिककर आणि पर्यटक या ठिकाणी गर्दी करत असतात. गेल्या काही दिवसांपासून नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने धरणसाठ्यात वाढ झाली त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात धरणाचे पाणी सोडण्यात आले असल्यामुळे गोदावरी नदी खळखळून वाहत आहे. तर नदीच्या मार्गात गंगापूर रोड भागात असलेल्या सोमेश्वर येथे असलेला हा धबधबा देखील खळखळून वाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *