Fri. Apr 16th, 2021

कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर कामावर परतली सोनाली बेंद्रे   

अभिमेत्री सोनाली बेंद्रेला गत वर्षी कॅन्सरचे निदान झाले आणि चाहत्यांमध्ये चिंता पसरली.

कॅन्सरच्या निदानानंतर सोनाली उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाली.

या काळात सोनालीने अतिशय धैर्याने या आजाराशी झुंज दिली आणि अखेर ती पूर्णपणे स्वस्थ होऊन भारतात परतली.

आणि आता सोनाली कामावरही परतली आहे.

ही आनंदाची बातमी सोनालीने स्वत: शेअर केली आहे.

इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत तिने याबाबतची माहिती दिली आहे. दीर्घकाळ आराम केल्यानंतर सेटवर परतते आहे.

अनेक पद्धतीने आणि अनेक पातळ्यांवर परीक्षा दिली. एक विचित्र अनुभव आहे.

कामावर परतण्याचा अभिमान वाटतोय.  हा क्षण शब्दांत मांडता येणार नाही.

कॅमेऱ्याला पुन्हा एकदा सामोरे जाणे आणि भाव-भावनां जिवंत करणे एक सुंदर अनुभव आहे.

गेल्या काही महिन्यांत माझ्या भावना लोप पावत चालल्या होत्या.

आजचा हा दिवस माझी मदत करणारा आहे, असे सोनालीने लिहिले आहे.

सोनालीचे हे शब्द निश्चितपणे अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत. सकारात्मकता, संयम आणि पराकोटीचे धैर्य या जोरावर सोनालीने कॅन्सरला परतवून लावले.

आता तिच्या नव्या प्रोजेक्टची चाहत्यांना प्रतीक्षा असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *