सोनाली कुलकर्णीने शेअर केले साखरपुड्याची काही खास फोटो
‘साखरपुड्याच्या पलीकडे आणि लग्नाच्या अलीकडे’…

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या साखरपुड्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. तिचा साखरपूडा होऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने तिने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सोनाली आणि कुणालने २ फेब्रुवारीला २०२०ला दुबईमध्ये साखरपूडा केला होता. कुणाल हा कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असतो. त्यामुळे त्यांनी साखरपूडा देखील दुबईमध्ये केला असे ऐकण्यात आलं होतं. तेव्हा देखील तिच्या साखरपूड्याचे फोटो हे सोशल मीडियावर चर्चेत होते. आताच तिचा साखरपुड्याला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे तिने काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने ‘साखरपुड्याच्या पलिकडे आणि लग्नाच्या अलीकडे’ असे कॅप्शन दिले आहें
कांजीवरम साडी, पारंपरिक दागिने, केसात माळलेला गजरा यांमध्ये सोनालीचं सौंदर्य अधिक खुलून दिसत होते .या पारंपरिक लूकमध्ये सोनाली अतिशय सुंदर दिसत आहे .तिचे हे फोटो पुन्हा पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. त्यांनी या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.