Sun. Apr 18th, 2021

सोनाली कुलकर्णीचा नवा सिनेमा ‘विक्की वेलिंगकर’ !

‘वेळेचे पाऊल आणि ‘विक्की वेलिंगकर’ची चाहूल, फक्त काळालाच कळते!’ असं सांगणारं ‘विक्की वेलिंगकर’चं पोस्टर प्रदर्शित झालंय. महाराष्ट्राची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी या सिनेमात मुख्य भूमिकेमध्ये आहे.

सौरभ वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती जीसिम्स, अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा, सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांनी केली आहे.

‘विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून तो एक घड्याळ विक्रेता आहे.

आयुष्यातील एका अनपेक्षित वेळी अत्यंत गूढ गोष्टीशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो.

या चित्रपटाची नायिका ही आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभी राहते.

यापूर्वी दिग्दर्शक सैरभ वर्मा यांनी ‘मिकी व्हायरस’ आणि ‘7 अवर्स टू गो’ आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

प्रख्यात मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहे. नटरंग, अजिंठा, झपाटलेला-२, क्लासमेट, मितवा, हंपी आणि असेच अनेक मराठी सिनेमांनंतर आता 6 डिसेंबर 2019 ला ती विक्की वेलिंगकरमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या नेतृत्वाखालील ‘जीसिम्स’ने यापूर्वी अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. मोगरा फुलला, फुगे, तुला कळणार नाही, रणांगण या चित्रपटांच्या निर्मितीबरोबर त्यांनी भिकारी या चित्रपटाची प्रस्तुती केली होती. ‘जीसिम्स’ हा मराठीतील एक आघाडीचा स्टुडियो असून कंपनी चित्रपट, टीव्ही आणि वेबसिरीज तसेच टॅलेंट मॅनेजमेंट आणि सॅटॅलाइट ॲग्रीगेशन या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. तर अनुया चव्हाण कुडेचा आणि रितेश कुडेचा हे दोघे ‘डान्सिंग शिवा’चे भागीदार आहेत. त्यांनी अलिकडेच हिंदी चित्रपट ‘द ताश्कंद फाईल्स’ची सह-निर्मिती केली होती. त्यांनी ‘ऑल अबाऊट सेक्शन 377’ या सध्या ‘सोनी लिव’वर सुरू असलेल्या वेबसिरीजची यशस्वी निर्मिती केली आहे. त्याचबरोबर ‘वोह वाली पिक्चर’ या ‘झी5’वर लवकरच येणाऱ्या वेब सिरीजची निर्मिती त्यांनी केली आहे. सचिन मारुती लोखंडे आणि अतुल जनार्दन तारकर यांच्या नेतृत्वाखालील लोकी स्टुडिओने सोशल मीडिया मार्केटिंग, ब्रँड असोशिएशन, ब्रँडेड कॉन्टेट, चित्रपट निर्मिती, व्हिज्युअल प्रमोशन आदी अनेक क्षेत्रांत काम केले आहे. या सर्वांचा आता विक्की वेलिंगकर लवकरच प्रदर्शित होतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *