Sat. Feb 27th, 2021

…आणि सोनम म्हणाली ‘या’ अटीवरच Munna Bhai 3 मध्ये काम करेन  

दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचे आतापर्यंत प्रत्येक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. या सुपरहिट ठरलेल्या सिनेमांच्या यादीमध्ये 2003 साली प्रदर्शित झालेला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या सिनेमाचे नाव आवर्जुन घेतले जाते.

संजय दत्तची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा आजही प्रेक्षकांना खळखळून हसवतो. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसविण्यासाठी या सिनेमाचा तिसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सध्या या सिनेमामध्ये अभिनेत्री सोनम कपूर झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र या सिनेमात काम करण्यासाठी सोनमने एक अट ठेवल्याचे पाहायला मिळत आहे.

सोनमचा ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ हा सिनेमा 1 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात सोनमने केलेल्या उत्तम अभिनयामुळे तिला ‘मुन्नाभाई 3’ साठी विचारणा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र सोनमे हे वृत्त फेटाळून लावत मला सिनेमासाठी कोणतीही ऑफर आली नाही. जर यापुढे कधी सिनेमासाठी ऑफर आली तर एका अटीवरच मी हा सिनेमा करेन, असे सोनमने एका मुलाखतीत म्हटले आहे.

‘मला ‘मुन्नाभाई’च्या सीरिजमध्ये काम करायला नक्कीच आवडेल. पण यासाठी माझी एक अट आहे. जर या सिनेमाचं नाव ‘मुन्नी बहन’ असेल तरच मी काम करेन, असे सोनमने म्हटल्याचे ‘टाईम्स नाऊ’च्या वृत्तामध्ये नमूद केले आहे.

‘सावरिया’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सोनमने संजू सिनेमातही काम केले होते. या सिनेमातील तिचे काम पाहता तिच्याकडे सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत.

‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या सिनेमामध्ये सोनम मुख्य भूमिकेत असून तिच्यासोबत अभिनेता अनिल कपूर झळकले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *