Wed. Mar 3rd, 2021

ट्रम्पकडून ब्रिटीश प्रिन्स हॅऱीच्या सुरक्षेला नकार, अभिनेत्री सोनम कपूर संतापली

अभिनेत्री सोनम कपूर ही आपल्या अभिनयापेक्षा इतर गोष्टींमुळेच जास्त चर्चेत असते. कधी फॅशन स्टेटमेंटमुळे, तर कधी वादग्रस्त बडबडीमुळे. अनेक गोष्टींवर सोनम कपूर Tweet करत असते. मात्र तिच्यावर टीकाच जास्त होते. त्यामुळे मध्ये काही काळ ती Twitter वरून गायबही झाली होती. मात्र पुन्हा Twitter वर सक्रिय झाल्यावर पुन्हा विविध विषयांवर ती मतं बिनधास्तपणे मांडू लागली आहे. कधी सरकारवर टीका केल्यामुळे किंवा कधी इतर एखाद्या सामाजिक मुद्द्यावर एकांगी विचार मांडल्यामुळे ती पुन्हा चर्चेत येऊ लागली आहे. सध्या जगभरात सुरू असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सोनम कपूरने थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले आहेत डोनाल्ड ट्रम्प?

इंग्लंडच्या महाराणी यांच्याशी माझा चांगला स्नेह आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल बकिंगहम पॅलेस सोडून कॅनडात स्थायिक झाले आहेत. मात्र त्यांनी अमेरिकेत येण्यासाठी कॅनडा सोडलं आहे. पण त्यांच्या सुरक्षेचा जो भार अमेरिकेवर पडेल, तो आम्ही उचलू शकत नाही. आपली सुरक्षा व्यवस्था त्यांनी आपली आपणच करावी. असं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. या Tweet मुळे बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिने संताप व्यक्त केला आहे.

सोनम कपूरचा संताप

अमेरिकेच्या नागरिकांना आता नक्कीच लाज वाटत असेल. सध्या जगात सर्वत्र कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. लोकांचे प्राण जात आहेत. अशा परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प कोरोनाला आळा घालण्याऐवजी वायफळ बडबड करून वेळ वाया घालवत आहेत, असं सोनम कपूरने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *