Sat. Oct 24th, 2020

सोनू निगमनं केलं मुंडण, मौलविंच्या प्रत्युत्तरला आव्हान

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पश्चिम बंगालच्या मौलविंनी 10 लाखांचं बक्षीस जाहीर केल्यानंतर सुप्रसिद्ध गायक सोनू निगमनं स्वत:चं मुंडण केलं.

 

सोनू निगमचे मुंडण करणाऱ्यास आणि चपलांचा हार घालणाऱ्यास सय्यद शाह आतेफ अली कादरींनी 10 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं.

 

मीच स्वत: मुंडण करतो 10 लाख तयार ठेवा. असं आव्हान करत सोनू निगमनं स्वत:च मुंडण केलं.

 

मी मुस्लीम नाही आणि तरीही मला अजानच्या आवाजामुळे झोपेतून उठावं लागतं. भारतातील जबरदस्तीची ही धार्मिकता कधी संपेल? असा सवाल सोनू निगमनं केला होता.

 

त्याच पार्श्वभूमीवर सय्यद शाह आतेफ अली कादरींनी सोनू निगमचं मुंडण करणाऱ्यास 10 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. मात्र आता स्वत: त्यानं सोनूनं मुंडण केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *