‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरव गांगुलीने ‘ट्विटर’द्वारे मोहम्मद सिराज केलं कौतुक
फुप्फुसांच्या आजारामुळे सिराजच्या वडिलांचे निधन…

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झालेल्या मोहम्मद सिराजच्या वडिलांचे शुक्रवारी निधन झाले. सिराजच्या वडिलांचा निधन हे ‘‘फुप्फुसांच्या आजारामुळे झाले. त्यानंतर ‘बीसीसीआय’ने याबाबत त्याच्याशी चर्चा केली. त्याच्यासमोर भारतात परतण्याचा पर्याय ठेवण्यात आला. मात्र त्याने भारतीय संघासमवेत राहण्याचा निर्णय घेतला. असं शाह यांनी सांगितले आहे. कठीण प्रसंगातही देशहिताला प्राधान्य देणाऱ्या सिराजचे ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुलीने ‘ट्विटर’द्वारे कौतुक केले आहे.
सौरव गांगुलीनं ट्विट मध्ये म्हटलेय की, या दुःखावर मात करण्यासाठी मोहम्मद सिराजला बळ मिळो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरी करण्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा… जबरदस्त व्यक्तिमत्व. कठीण प्रसंगातही देशहिताला प्राधान्य देणाऱ्या सिराजचे कौतुक वाटतेय. बीसीसीआय अध्यक्ष जय शाह यांनी शनिवारी एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं होत या पत्रकात सिराजनं राष्ट्रहितासाठी प्राधान्य दिल्याचं सांगितलं जात आहे. दुखा:चा डोंगर कोसळला असतानाही राष्ट्रहितासाठी सिराजनं प्राधान्य दिलं आहे. यामुळे सिराजचं कौतुक हे देशभरातून सोशल मीडियावर होतांना दिसत आहे.
May Mohammed siraj have a lot of strength to overcome this loss..lots of good wishes for his success in this trip.. tremendous character @bcci
— Sourav Ganguly (@SGanguly99) November 21, 2020
सिडनीत मोहम्मद सिराज सराव करत होता. सराव करुन सिराज परतल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य कोच रवी शास्त्री यांनी वडिलांच्या निधनाबाबद बातमी ही सिराजला दिली. सिराजचे वडील मोहम्मद घौस रिक्षा चालवून सिराजचे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न साकारले.
सिराजनं रणजी हंगामात हैदराबादकडून ४१ बळी घेतल्यामुळे तो प्रकाशझोतात आला. २०१६-१७ च्या रणजी हंगामात हैदराबादकडून खेळत असताना सिराजने ४१ बळी घेवून सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होते. त्यानंतर सिराजला आयपीएलमध्ये RCB च्या संघाकडून संधी मिळाली. आयपीएल च्या तेराव्या हंगामात सिराजच्या उत्तम कामगिरीमुळे चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.