टीम इंडिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी साऊथ आफ्रिकेची घोषणा

न्यूझीलंडने टीम इंडियाचा वनडे सीरिज पाठोपाठ टेस्ट सीरिजमध्येही व्हॉईटवॉशने पराभव केला. यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेसोबत 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.
टीम इंडिया विरुद्धच्या या वनडे सीरिजसाठी दक्षिण आफ्रिकेच्या १५ खेळाडूंची घोषणा केली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघात माजी कॅप्टन फॅफ डु प्लेसिस याला स्थान देण्यात आलं आहे. तसेच रस्सी वॅन-डर डुसेनला ही टीम इंडिया विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी संधी देण्यात आली आहे.
क्विटंन डी कॉक याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका टीम इंडिया विरुद्ध भिडणार आहे.
येत्या १२ मार्चपासून या वनडे सीरिजला सुरुवात होत आहे. एकूण ३ सामन्यांची ही वनडे मालिका असणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे सीरिज
पहिली वनडे, १२ मार्च, धर्मशाळा
दुसरी वनडे, १५ मार्च, लखनऊ
तिसरी वनडे, १८ मार्च, कोलकाता
टीम साऊथ आफ्रिका : क्विंटन डिकॉक (कॅप्टन), टेम्बा बव्हुमा, रस्सी वॅन-डर डुसेन , फाफ डु प्लेसी, कायल वेरेन, हेन्री क्लासें, डेविड मिलर, जेजे स्मट्स, एंडिले फेहलुकवायो, लुंगी एनगिडी, लुथो सिपाम्ला, ब्यूरेन हेंड्रिक्स, एनरिच नोर्ट्जे, जॉर्ज लिंडे, केशव महाराज.
दरम्यान साऊथ आफ्रिका विरुद्धच्या या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाही.