Tue. Mar 31st, 2020

SAvsEng,1st T20I : अटीतटीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा इंगलंडवर 1 रनने विजय

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या टी -२० सामन्यामध्ये इंग्लंडचा अवघ्या १ धावाने पराभव केला आहे. इंग्लंडला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी ७ धावांची गरज होती.

परंतु शेवटच्या २० व्या ओव्हरमध्ये लुंगी एन्गिडीच्या भेदक आणि अचूक माऱ्यामुळे इंग्लंडंचा १ धावाने पराभव झाला.

या विजयासह दक्षिण आफ्रिकेने ३ टी-२०  सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

इंग्लंडकडून सर्वाधिक ७० धावा जेसन रॉय याने केल्या. तर इयन मॉर्गन यानेही ५२ रन्स केल्या.

दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक  ३ विकेट लुंगी एन्गिडी यांनी घेतल्या. तर पुहेलकोवायो आणि ब्युरन हेंड्रिक्स या दोघांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर डेल स्टेननेही १ विकेट घेतली.

दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला विजयासाठी २० ओव्हरमध्ये १७८ धावांचे आव्हान दिले होते. दक्षिण आफ्रिकेने २० ओव्हरमध्ये १७७ धावा केल्या होत्या.

विजयासाठी दिलेल्या आव्हानाचं पाठलाग करताना इंग्लंडने पहिली विकेट १९ धावांवर गमावली. इंग्लंडला जॉस बटलरच्या रुपात पहिला झटका लागला. बटलरला  स्टेनने १५ धावांवर बाद केले.

यानंतर आलेल्या जॉनी बॅरिस्टोच्याच्या सोबतीने जेसन रॉय यांनी इंग्लंडला चांगली सुरुवात दिली. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी  ७२ धावांची भागीदारी झाली.

इंग्लंडला दुसरा धक्का ९१ धावा असताना लागला. ही जोडी तोडायला पुहेलकोवायो याला यश आले.  पुहेलकोवायो याने जॉनी बॅरोस्टो याला २३ रन्सवर एलबीडब्लयू केलं.

यानंतर तिसऱ्या विकेटसाठी  जेसन रॉय आणि कॅप्टन इयन मॉर्गन यांच्यात  ४१ धावांची भागीदारी झाली. पंरतु ही जोडीही विशेष काही करु शकली नाही. 

इंग्लंडने १३२ धावासंख्येवर तिसरा विकेट गमावला. सलामीवर जेसन रॉय ७० धावा करुन कॅचआऊट झाला.

यानंतर दक्षिण आफ्रिकेने ठराविक अंतराने इंग्लंडला झटके दिले. इंग्लंडच्या  ५ खेळाडूंना दुहेरी धावाही करता आल्या नाहीत.

याआधी इंग्लंडने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. त्यामुळे इंग्लंडने आफ्रिकेला बॅटिंग करणं भाग पाडलं.

बॅटिंगसाठी आलेल्या साऊथ आफ्रिकेची चांगली सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी टेंबा बावुमा आणि क्विंटन डी कॉक या ओपनर जोडीने ४८ धावा जोडल्या. 

आफ्रिकेला पहिल झटका क्विटंन डी कॉकच्या रुपाने लागला. मोईन अलीने त्याला डी कॉकला ३१ रन्सवर आऊट केलं.

डी कॉकनंतर रस्सी व्हॅन डर ड्यूसेन खेळायला आला. दुसऱ्या विकेटसाठी टेंबा बावुमा आणि रस्सी व्हॅन डर ड्यूसेन यांनी अर्धशतकी पार्टनरशीप केली.

या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची पार्टनरशीप केली.

साऊथ आफ्रिकेकडून टेंबा बावुमाने सर्वाधिक ४३ धावा केल्या. तर क्विटंन डी कॉक आणि स्सी व्हॅन डर ड्यूसेन या दोघांनी प्रत्येकी ३१ धावा केल्या.

इंग्लंडच्या  ख्रिस जॉर्डन याने सर्वाधिक २ विकेट घेतल्या. तर इतर सर्व बॉलर्सने प्रत्येकी १ विकेट घेतला.

दरम्यान साऊथ आफ्रिकेच्या विजयामुळे ३ टी -२० मॅचच्या सीरिजमध्ये आफ्रिकेने १-० अशी आघाडी घेतली आहे.

त्यामुळे आता इंग्लंडला मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी दुसरी टी-२० जिंकणं अनिर्वाय असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *