कोरोनाचा धसका : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमापूर्वी औषध फवारणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लोणावळ्यातील एका कार्यक्रमाआधी औषध फवारणी करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या हस्ते लोणावळ्यात एका हॉटेलचं उद्घाटन करण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री लोणावळ्यात येणार म्हटल्यावर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमणार. त्यामुळे खबरदारी म्हणून कार्यक्रमाच्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली.
अजित पवार उद्घाटनासाठी येणार म्हणून जय्यत तयारी करण्यात आली होती. अजित पवार यांच्या स्वागतासाठी मोठमोठे बॅनर लावले होते. पण अजित पवार येणार नसल्याची माहिती मिळाल्याने बॅनर उतरवले.
पण यानंतर अजित पवार पुण्यातील बैठक संपवून उद्घाटनाला येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पुन्हा बॅनर चढवण्यात आले.
नुकतेच सोमवारी एक दाम्पत्य हे दुबईहून पुण्यात दाखल झाले. यांना कोरोना नेगेटीव्ह असल्याचं निदान झालं. यामुळे खबरदारीचा घेतली जात आहे.
तसेच अजित पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला आवाहन केलं आहे.
राज्यावर आणि देशावर कोरोना विषाणूचं संकट आहे. त्यामुळे काळजी घ्या. कोणाचा हात हातात घ्यायचा नाही.
घरात गेल्यावर हातात हात घ्या. बाहेर कोणाला वाईट वाटलं, तरी चालेल. पण कोणाच्या हातात हात देऊ नका’, असे अजित पवार म्हणाले.