Fri. Mar 5th, 2021

रशियात ‘स्पुटनिक-व्ही’ लसीच्या चाचणीतील स्वयंसेवकांना कोरोनाचा संसर्ग

अ‌ॅलेक्झँडर जिन्ट्सबर्गच्या माहितीनुसार पहिल्या डोस नंतर 85% लोकांमध्ये कोणतेही दुष्परिणाम झालेले दिसले नाहीत. उर्वरित 15% लोकांवर त्याचे दुष्परिणाम आहेत.

जगभरात कोरोनाचा विळखा पाहता त्याचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वप्रथम रशिया कडून ‘स्पुटनिक-व्ही’ ( SputnikV, ) ही लस आता रशियामध्ये देण्यास सुरूवात झाली आहे.रशियाच्या एका वृत्तवाहिनीतर्फे दिलेल्या माहितीनुसार यामध्ये सहभागी असणाऱ्या काही स्वयंसेवकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
कोरोना लसीच्या मानवी चाचणीवेळी सहभागी सदस्यांना कोरोनाची लस दिली जाते,आणि बाकी सदस्यांना प्लासेबो दिला जातो.आता ज्या सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे,त्याला कोरोना लसीचा डोस दिला होता की प्लासेबो याबाबत माहिती समोर आली नाही. याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही. असे गामलेया नॅशनल रिसर्च सेंटरचे उपसंचालक डेनिस लॉगुनोव्ह यांनी सांगितले आहे
ज्या स्वयंसेवकाला कोरोनाची लागण झाली आहे तो कदाचित लसीचा डोस दिलेल्या नाही, तर प्लासेबो गटातला सदस्य असावा अशी शक्यता रिसर्च सेंटरचे संचालक अ‌ॅलेक्झँडर जिन्ट्सबर्ग यांनी वर्तवली आहे
तसेच ‘स्पुटनिक-व्ही’ या लसीच्या मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा सुरू आहे.अ‌ॅलेक्झँडर जिन्ट्सबर्ग यांनी माहितीनुसार लसीच्या पहिल्या डोस नंतर सुमारे 85% लोकांमध्ये त्याचे कोणतेही दुष्परिणाम झालेले दिसले नाहीत.तर उर्वरित 15% लोकांवर त्याचे दुष्परिणाम आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *