Thu. Apr 9th, 2020

मंगळवारपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात

मंगळवार ३ मार्चपासून दहावीच्या (ssc examiniation)परीक्षेला सुरुवात होत आहे. १० वीच्या परीक्षेला यंदाच्या शैक्षणिक वर्षात एकूण १७ लाख ६५ हजार ८९८ मुल परीक्षा देणार आहेत.

यापैकी एकूण ९ लाख ७५ हजार ८९४ विद्यार्थी आहेत. तर ९ लाख ७५ हजार ८९४ विद्यार्थीनी परीक्षेला सामोरे जाणार आहेत.

३ ते २३ मार्च २०२० या कालावधीत होणार दहावीच्या परीक्षा पार पडणार आहेत.

राज्यातील एकूण ४९७९ परीक्षा केंद्रावर परीक्षा पार पडणार आहे. एकूण नऊ विभागीय मंडळामार्फत परीक्षा घेण्यात येणार आहे.

एकूण ७९ उपद्रवी केंद्र तसेच २७४ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विभागीय मंडळाला हेल्पलाईन देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *