Tue. Sep 29th, 2020

STच्या नियमित बसफेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांचा टपावरून जीवघेणा प्रवास!

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ST महामंडळाच्या अनियमित बसफेऱ्यांमुळे त्रास सहन करावा लागतोय. शाळा, कॉलेजेससाठी पासेस तर दिले जातायत. मात्र बसेस कधीच वेळेत येत नाही. दैनंदिन वेळापत्रक पाळलंच जात नाहीय. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात विद्यार्थ्यांना चक्क STच्या टपावर बसून जीवघेणा प्रवास करावा लागतोय.

काय आहे परिस्थिती?

कवळगावावरून खामगावकडे निघालेल्या खामगाव आगाराच्या एसटी बसमध्ये दिवठाणा येथील शाळेच्या विदयार्थ्यांना बसच्या टपावर बसून जावं लागत आहे.

35 किमीच्या या धोकादायक प्रवासात सुदैवाने कुठल्याही विद्यार्थ्यंला इजा पोहचली नाही.

शाळा, महाविद्यालयात येण्यासाठी बसफेरी वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांना हा जीवघेणा पवित्रा घ्यावा लागला.

शाळा सुटल्यानंतरही विद्यार्थी कित्येक तास बसस्थानकावरच असतात. बसही कधीच वेळेवर येत नाही.

हे चित्र संपूर्ण जिल्ह्यात दिसून येत आहे. सोमवारी सुद्धा बसस्थानकावर ST बसची वाट पाहात विद्यार्थी बसून होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *