Fri. Jan 21st, 2022

एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

  एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्यात गेले काही दिवस आंदोलन सुरू आहे. तसेच मागण्या मान्य करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यातच सांगलीतील एसटी कर्मचारी राजेंद्र पाटील यांचा राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतातरी सरकारला जाग येणार  का? अशी संतप्त प्रतिक्रिया एसटी कर्मचारी देत आहेत.

  एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढ आणि आणि एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे एसटी बससेवा बंद असून प्रवाशांचे हाल होत आहेत. बससेवा बंद असल्यामुळे खाजगी गाड्यांनी प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे प्रवाशांकडून आर्थिक लूट सुरू आहेत. मात्र मागण्या पूर्ण करण्यासाठी एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबांबत सरकारने लवकरात लवकर निर्मय घ्यावा अशी मागणी एसटी कर्मचारी करत आहेत.

एसटी कर्मचारी राज ठाकरेंच्या भेटीला

 एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची भेटीनंतर यांनी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या न करण्याची कळकळीची विनंती केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळू नये यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात राज ठाकरे स्वत: लक्ष घालणार असून लवकरच ते राज्य सरकारशी संवाद साधून कर्मचाऱ्यांशी बोलणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *