Sat. Aug 13th, 2022

आमदार नितेश राणेंनी चालवली एसटी

   एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आज तेरावा दिवस आहे. एकीकडे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे तर दुसरीकडे ठाण्यात आमदार नितेश राणे यांनी एसटी बस चालवली आहे.

   आमदार नितेश राणे यांचा एसटी चालवण्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देत ठाण्यात आमदार नितेश राणे यांनी एसटी चालवली आहे. आंदोलक कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज नितेश राणे ठाण्यात दाखल झाले होते. तेथे त्यांनी एसटी चालवत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत निर्णय नाही

  एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर अद्याप एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसंबंधी अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघण्याची नाकारली जात  आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.