एसटी बसेसमध्ये आता वायफायवर पाहा मुव्हीज
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
खाजगी बसेसबरोबर स्पर्धा करण्यासाठी ST महामंडळ अनेक क्लुप्त्या लढवत व्यवसाय वृद्धीचा प्रयत्न करत आहे.
ST महामंडळाने गुहागर आगारातील 80 गाड्यांमध्ये वायफाद्वारे मोबाईलवर सिनेमा पाहण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली.
त्यामुळे प्रवास करताना हिंदी आणि मराठी भाषेतील सिनेमा पाहण्याची संधी प्रवाशांना मिळणार आहे. इन्फो कंपनीने या बसेसमध्ये वाय़फाय बसवले.
ST मधुन प्रवास करताना आता खाजगी गाडीतून प्रवास केल्याचा अनुभव मिळत असल्याचं प्रवासी सांगत आहेत. या सुविधेमुळे प्रवासी संख्येतही वाढ होत असल्याचं ST कर्मचारी सांगत आहेत.