Wed. Jan 19th, 2022

धुळ्यात ढोल वाजवून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच असून आज धुळ्यात एसटी आगारात कर्मचाऱ्यांनी ढोल वाजवून अनोखे आंदोलन करत राज्य सरकार आणि एसटी प्रशासनाचा निषेध केला.

धुळे येथे एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारने आपल्या मागण्यांकडे लक्ष द्यावे यासाठी ढोल वाजवून आंदोलन केले. परिवहन मंत्री अनिल परब ज्या संघटनांशी बोलत आहेत त्यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही, ऍड. गुणरत्न सदावर्ते जे निर्णय घेतील तेच निर्णय आम्हाला मान्य असतील असेही या आंदोलनकत्यांनी सांगितले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी पूर्ण होईपर्यंत राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे राज्य सरकरा दुर्लक्ष करत असल्याचा आरोप एसटी कर्मचारी करत आहेत. त्यामुळे जोवर विलिनीकरणाची मागणी मान्य होत नाही तोवर आंदोलनाची भूमिका कर्मचाऱ्यांनी स्विकारली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *