Thu. Jan 20th, 2022

सोलापूरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच

एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. राज्यात ठिकठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. गेल्या महिन्याभरापासून सोलापूरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. वीस दिवसांहून अधिक दिवस सांगलीतील एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे एसटी संपामुळे महामंडळाचे २२ कोटींचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

गेल्या महिन्याभरापासून सांगलीत एसटी कर्मचारी आंदोलनावर बसले आहेत. त्यामुळे सांगलीतील नऊ एसटी आगारातील बसच्या तब्बल तीन हजार फेऱ्या ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाचे २२ कोटींचे नुकसान झाले आहे. एसटी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन राज्य सरकार करत आहे. तरीही आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू झाले नाही तर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे. मात्र तरिही कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे राज्य सरकारने कारवाई करत सोलापूरमधील २८ एसटी कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती तर २९६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

सोलापूरमध्ये गेले महिनाभर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे जिल्ह्यातील एसटीसेवा बंद झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नोकरदार, विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल होत आहे. प्रवास करण्यासाठी प्रवाशांना जास्तीचे पैसे मोजावे लागत  आहेत.

विलिनीकरणाची मागणी पूर्ण होईपर्यंत राज्य सरकराने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करण्याचा निर्णय घेतला. तसेच संप मागे घेण्याचे आवाहनही परिवहन मंत्री अनिल परब कर्मचाऱ्यांना करत आहे. आंदोलन मागे घेतले नाही तर कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशाराही राज्य सरकारने दिला आहे. तसेच अनेक संपकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून अनेकांवर सेवा समाप्तीची कारवाईही राज्य सरकारने केली आहे. तरिही अद्याप कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *