Wed. Jan 19th, 2022

मुंबईतील स्टार इंग्लिश खाजगी शाळेनं केली विद्यार्थ्यांची फी माफ

कोरोनामुळे राज्यभरात टाळेबंदी करण्यात आले होती . त्यामुळे अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडल्याने अनेकांचे रोजगार हिरावले आहेत. अशा कठीण परिस्थितीत आपल्या मुलांची शालेय फी भरणे देखील पालकांसाठी कठीण झाले आहे. असे असताना काही शाळा फी भरण्यासाठी पालकांकडे तगादा लावत आहे. मात्र मुंबईतील एका शाळेनं आपल्या विद्यार्थ्यांची फी माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे अडचणीच्या परिस्थितीत पालकांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईतील मालवणी येथील होली स्टार या इंग्रजी शाळेने आपल्या शाळेत शिकत असलेल्या तब्बल एक हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करणारी मुंबईतील ही पहिली शाळा ठरली असून, या विषयी पालक संघटनांकडून या शाळेच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले जात आहे. इतर शाळांनी फीसाठी पालकांकडे तगादा लावला असताना होली स्टार या शाळेनं घेतलेला निर्णय खरोखरच स्वागतार्ह असून, इतर शाळांनीही यातून बोध घेऊन, फी माफी शक्य नसल्यास काहीतरी सवलत देण्याची अपेक्षा पालकाकांकडून व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *