Sun. Jan 16th, 2022

‘नाशिकमधील साखर कारखाने सुरु करा’ – राजू शेट्टी

नाशिकमधील निफाड तालुक्यात ११ टन ऊसाचे उत्पादन होत असून या तालुक्यामध्ये तीन पैकी एकच साखर कारखाना चालू असल्याने केवळ ३ टन ऊसाचे गाळप होत आहे. त्यामुळे उरलेल्या ८ टन ऊसाच्या गाळपासाठी इतर जिल्ह्यावर अवलंबून राहण्याची वेळ येत आहे, त्यामुळे नाशिक जिह्यातील बंद असलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करावे, ऊसाला एफआरपीप्रमाणे भाव मिळावा, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्य अध्यक्षतेखाली ऊसपरिषद घेण्यात आली. यावेळी नाशिकमधील बंद असलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. नाशिकमधील निफाड तालुक्यात एकूण तीन साखर कारखाने आहेत. यातीन तीनपैकी केवळ एकच साखर कारखाना सध्या सुरू आहे. तसेच या तालुक्यात ११ टन ऊसाचे उत्पादन घेतले जाते. मात्र केवळ एकच साखर कारखाना सुरू असल्यामुळे केवळ ३ टन ऊसाचे गाळप होत आहे. त्यामुळे उर्वरीत ८ टन ऊसाचे उत्पादन घेण्यासाठी जिल्ह्यातील उर्वरीत २ साखर कारखाने पुन्हा सुरू करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ऊसपरिषद घेत केली आहे. तसेच ऊसपरिषदेसारखीच द्राक्ष परिषदही घेण्यात येण्यार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *