Fri. Apr 23rd, 2021

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा

राज्यातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर्षासाठीचे हे मानाचे पुरस्कार जाहीर केले आहेत.

या पुरस्कारांचे वितरण शनिवार दिनांक २२फेब्रुवारी रोजी वाजता गेटवे ऑफ इंडिया येथे होणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणारे खेळाडू, संघटक आणि प्रशिक्षकांना दरवर्षी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येतात.

शिवछत्रपती पुरस्कारासाठी जीवन गौरव, मार्गदर्शन, संघटक, कार्यकर्ते, खेळाडू अशा एकूण पाच गटातून 289 अर्ज करण्यात आले होते. यातून ६३ जणांची ५ गटातून पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *