Wed. Jan 19th, 2022

‘संसदीय कामकाजात राज्य सरकार उदासीन’ – देवेंद्र फडणवीस

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेश मुंबईत होण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच राज्याचे हिवाळी अधिवेशन येत्या २० ते २८ डिसेंबर दरम्यान होणार आहे. दरम्यान यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

संसदीय कामकाजात राज्य सरकार उदासीन असल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. हिवाळी अधिवेशन केवळ पाच दिवसांचे असल्याचा निर्णय झाल्यामुळे, अधिवेशनाचा कालावधी आणखी काही दिवस वाढवण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

राज्यसरकारचे ५ दिवसांचे तोकडं अधिवेशन असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यसरकार हिवाळी अधिवेशन टाळत असल्याचा आरोप फडणवीसांनी मविआवर केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन झालेले नाही. त्यामुळे विदर्भामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होतान दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे यंदा मुंबईतच हिवाळी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मार्चमधील अधिवेशन हे नागपूरला घेण्यात यावे असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *