सुनेच्या हट्टामुळे घरावर उभारला शिवाजी महाराजांचा पुतळा

राज हट्ट, स्त्री हट्ट आणी बाल हट्टासमोर झुकावचं लागतं. याचीच पुन्हा प्रचिती नांदेडमध्ये आली आहे. सुनबाईच्या हट्टामुळे नांदेडमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा घरावर बांधण्यात आला आहे.
नांदेडमधील भगतसिंग चौकाशेजारील वरपडे दाम्पत्यांनी आपल्या सुनेचा हट्ट पुरवला आहे.
असा आहे अश्वरुढ पुतळा
पाच मजली इमारतीवर शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे. शिवाजी महाराजांचा हा पुतळा अश्वरूढ आहे.
या पुतळ्याचा चबुतरा पाच फुट इतका आहे. हा अश्वरुढ पुतळा सात फूट उंचीचा आहे.
शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा ब्राँझ पासून बनवला आहे. शेगाव येथील कारागिराकडून बनवून घेतला आहे.
या पुतळ्याच्या संरक्षणासाठी सी सी टीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम देखील सुरू आहे.
शिवजयंतीच्या दिवशीच या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.
दरम्यान अश्वरूढ पुतळा घरावर उभरालेल्या उपक्रमाची नांदेडात जोरात चर्चा सुरू आहे.