राज्यात एसटी बससेवा कर्मचारी कोरोनाबाधित
१ हजार ६७९ कर्मचारी सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनाबाधित

राज्यात एसटी बससेवा कर्मचारी कोरोनाबाधित झाले असुन त्यांची संख्या २ हजारांवर गेली आहे. ३२९ कर्मचारी १२ दिवसात कोरोनाबाधित झाले आहेत तसेच मृत कर्मचा-यांची संख्या ६७ वर गेली आहे
लॉकडाऊनच्या चौथ्या पर्वात रेड झोन आणि कंटेन्मेंट झोन वगळता एसटी सेवा चालु झाल्या. जिल्ह्यातील अनेक मार्गावर चालु केलेल्या एसटी बससेवा टप्प्याटप्प्याने जिल्ह्याबाहेरही सेवा सुरू करण्यात आल्या.
मास्क सॅनिटाईझर या सर्वांची खबरदारी घेऊन सुरू करण्यात आलेल्या एसटी बससेवांसोबतच सर्व एसटी बस कर्मचारी कामावर रूजु होऊ लागले आहेत. १ हजार ६७९ कर्मचारी सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनाबाधित होते तर ५७ कर्मचारी दगावले होते परंतु गेल्या काही दिवसांत रूग्णांच्या संख्येत वाढ होतेय.
१३ ऑक्टोबपर्यंत २ हजार ०८ कर्मचारी कोरोनाबाधित झाले असुन यामध्ये मंगळवारी आणखी ३३ कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली आहे . एकूण १ हजार ५३५ कर्मचारी कोरोनामुक्त झाले तर ४०६ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहे.