Sun. Oct 17th, 2021

पुणे महापालिकेतील गैरव्यवहाराचे बिंग फुटले; स्टींग ऑपरेशनची क्लीप व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पुणे महापालिकेत अधिकारी आणि नगरसेवक यांच्या संगनमतानं कसा गैरव्यवहार चालतो याचं बिंग एका स्टींग ऑपरेशनमुळे फुटले.

 

साधारणत: वर्षभरापूर्वी पालिकेच्या एका कर्मचाऱ्याच्या झालेल्या स्टींग ऑपरेशनची क्लीप व्हायरल झाल्यानं हा संपूर्ण प्रकार उजेडात आला.

 

या क्लीपमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या खाणावळीचा ठेका मिळवण्यासाठी संबंधित अधिकारी आणि काही नगरसेवक कसे एकत्र आले हे

उघड झाले आहे.

या दोघांनी अन्य ठेकेदारांना अपात्र करण्यासाठी कसे प्रयत्न केले याची कबुली संबंधित कर्मचाऱ्यानं दिली. तसेच शाळांमध्ये बदल्या करताना अधिकारी आणि पदाधिकारी

तसेच सदस्यांना किती पैसे मिळाले याची कबुली देण्यात आली.

 

यामध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर मंडळाच्या माजी अध्यक्षांचा नामोल्लेख करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *