Fri. Apr 23rd, 2021

पाकिस्तानसोबत खेळणं थांबवू नये – सुशील कुमार

पाकिस्तानी क्रिकेट संघाला विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळू नये यासाठी बीसीसीआयच्या हालचाली सुरू असतानाच पुलवामा हल्ल्याचा परिणाम खेळावर होऊ नये, असे मत ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार याने व्यक्त केलं आहे.

‘खेळ हा मनं जोडणारा दुवा असतो. त्यामुळे पाकिस्तानशी खेळणं थांबवलं जाऊ नये, असे त्याने म्हटले आहे.

नागपूरमध्ये एका आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सुशीलकुमार याच्या हस्ते झाले.

त्यावेळी त्याने जम्मू-काश्मिरच्या पुलवामा हल्ल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली.

काय म्हणाला सुशील कुमार ?

  • ‘पुलवामाच्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाप्रती मला सहानुभूतीही आहे.
  • मात्र या हल्ल्याचा परिणाम खेळावर व्हायला नको,’
  • असं सुशीलकुमारनं स्पष्ट केलं. ‘खेळ दोन देशांना जोडतो.
  • युवकांना संधी देतो. संबंध सुधारतो. त्यामुळे खेळ थांबवणे मला योग्य वाटत नाही. उलट खेळाला प्रोत्साहन द्यायला हवे,’ असे सुशील कुमारने म्हटले आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर सर्वच क्षेत्रात पाकिस्तानवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

राजकीय व सिने क्षेत्रात तशी पावलंही उचलण्यात आली आहेत.

क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनाही पाकिस्ताशी संबंध ठेवण्यास विरोध केला आहे.

माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह, सौरभ गांगुली यांच्यासह अनेकांनी तशी जाहीर भूमिका मांडली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *