Mon. Jul 13th, 2020

फर्ग्युसन कॉलेजमध्ये सत्यनारायण पूजा, विद्यार्थी संघटनांचा विरोध

जय महाराष्ट्र न्यूज, पूणे

शिक्षणाचे माहेरघर समजला जाणाऱ्या पुण्यामध्ये वेगळा प्रकार घडला आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा सत्यनारायणाची महापूजा घातली गेलेली आहे.

श्रावण महिना सुरू असल्यामुळे ही महापूजा घातली होती. एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये धार्मिक कार्यक्रम कसे घेऊ शकतात असा प्रश्न आता काही विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेला आहे.

फर्गुसन कॉलेजमध्ये फुले शाहू आंबेडकर विचार धारेच्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी सुरू केली असून कॉलेजमध्ये धार्मिक अनुष्ठान घेणाऱ्या प्राचार्याला निलंबित करा अशी मागणीही करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे एखाद्या मंदिरापूढे लावण्यात येणाऱ्या पाटीप्रमाणे इथे बोर्ड लावण्यात आला असून, सर्वांनी पूजेच्या तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असं लिहिण्यात आलं आहे.

देश- विदेशातील सर्व जाती धर्माचे विद्यार्थी फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेतात. विद्यालयात सर्व जाती-धर्म एक समान मानले जातात. शासनाच्या कुठल्याही संस्थेत धार्मिक कार्यक्रम करण्याची परवानगी नाही तसा अध्यादेश असताना फर्ग्युसनमध्ये घालण्यात आलेल्या महापूजेने कॉलेज प्रशासन धार्मिक रुढीचं उदात्तीकरण करत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. त्यामुळे प्राध्यापकांनी लेखी माफी मागावी यावर विद्यार्थी ठाम आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *