Thu. Dec 2nd, 2021

आरोग्य विभागाच्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त वेळ

  राज्यात होणाऱ्या आरोग्य विभागातील अनेक पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या परिक्षेत पुणे, नाशिक केंद्रांवर गोंधळ उडाला. पुण्यातील परिक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका उशीरा मिळाल्या तर काही ठिकाणी प्रश्नपत्रिकाच कमी आल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे परिक्षा देणाऱ्या उमेदवाऱ्यांना पेपर लिहिण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात येईल असे आरोग्य मंत्री रोजेश टोपे यांनी सांगितले आहे.

  ‘नाशिक, पुणे केंद्रावर प्रश्नपत्रिका ज्या बॉक्समधून देण्यात आल्या होत्या, त्या डिजीटल बॉक्सचे लॉक उघडण्यास उशीर झाला. हा दहा मिनिटांचा विलंब झाल्याने विद्यार्थ्यांना तितका अतिरिक्त वेळ पेपर लिहिण्यास देण्यात येणार आहे,’ असे आरोग्यमंत्री रोजेश टोपे यांनी सांगितले आहे.

  आरोग्य विभागातील गट क प्रवर्गातील पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत पुण्यातील केंद्रावर गोंधळ निर्माण झाला. पुण्यातील परिक्षेच्या केंद्रावर प्रश्नपत्रिकाच उशीरा पोहचल्या तसेच परिक्षकदेखील वेळेत आले नसल्याने विद्यार्थी संतप्त झाले. आरोग्य विभाग परिक्षेच्या प्रश्नपत्रिका काही विद्यार्थ्यांना मिळाल्या तर काही विद्यार्थ्यांना मिळाल्या नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी राज्य सरकार, आरोग्य विभागाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *