‘निवडणुकीच्या तोंडावर असे मुद्दे सुचतात’ – इम्तियाज जलील

राज्यांतील दुकानांचे नामफलक हे मराठीत असण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे विरोधक महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत आहेत. आता मराठी पाट्याच्या निर्णयावर खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर सरकारला असे मुद्दे सुचतात, अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या मराठी पाट्या लावण्याच्या निर्णयामुळे राजकारण चांगलेच आहे. मराठी तरुण बेरोजगार आहे. त्यांच्यासाठी काही करायला हवे. मराठी तरुण बेरोजगार असून त्यांच्यासाठी काही न करता निवडणुक तोंडावर आली असताना सरकारला असे मुद्दे सुचतात, अशी टीका औरंगाबदचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.
तसेच मविआचा मराठी पाट्यांचा पुळका बेगडी, अशी टीका भाजप नेते चित्रा वाघ यांनी केली आहे. डीपीडीसीच्या बैठकीमध्ये आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी इंग्रजीमध्ये चर्चा केल्यामुळे, त्यांचे मराठी प्रेम हे बेगडी असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
Sick! Just received a brand-new Pearl and I can now read your weblog on my phone’s browser, it didn’t do the job on my old one.