Tue. Oct 19th, 2021

दिल्लीचा सुमितकुमार ठरला हिंदकेसरी किताबाचा मानकरी

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

दिल्लीच्या पैलवाल सुमित कुमार यंदाचा हिंदकेसरी ठरला. सुमितकुमारनं हिंदकेसरी किताबाच्या निर्णायक कुस्तीत महाराष्ट्राच्या अभिजीत कटकेवर 9-2 अशी मात केली.

 

त्यामुळे अभिजीतला महाराष्ट्र केसरीपाठोपाठ यंदा हिंदकेसरी कुस्तीतही उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागले.

 

पण वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी अभिजीत कटकेनं महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरीच्याही फायनलमध्ये मारलेली धडक ही त्याच्या उज्ज्वल भवितव्याची खात्री देत आहे.

 

पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीनं यंदा हिंदकेसरी स्पर्धेचं आयोजन सारसाबागेतल्या सणस मैदानात करण्यात आलं होते.

 

या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही सुमितनं अभिजीतला हरवलं होते.  मात्र त्या पराभवानं खचून न जाता अभिजीतनं परतीच्या लढतीत आक्रमक खेळ केला आणि क्रिशनकुमारला 8-3 असं

हरवून फायनल गाठली होती.

 

फायनलमध्ये सुमितनं त्याच्यावर पुन्हा वर्चस्व गाजवलं.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *